नमस्कार, मी महेश बोधगिरे. मनात उमटणाऱ्या भावना, भेटलेली माणसं आणि जगताना सापडलेले विचार शब्दांत जपण्याचा हा माझा प्रयत्न.

बेधुंद ही माझ्या मराठी लेखनासाठीची जागा आहे. एखादा साधा क्षण, मनात राहिलेली आठवण किंवा एखादा प्रश्न—कधी कविता बनतो, कधी कथा, तर कधी निवांतपणे मांडलेला विचार.
इथलं लेखन घाईत वाचण्यापेक्षा थोडं थांबून अनुभवावं, आणि त्यातला एखादा शब्द तुमच्या मनापर्यंत पोहोचावा, हीच इच्छा.
“शब्द सुंदर असण्यापेक्षा खरे असावेत; ते मनापासून आले, तर मनापर्यंत पोहोचतात.”
म्हणून इथे अनुभवांना सजवण्यापेक्षा त्यांचं खरं रूप जपण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक लेखनाला स्वतःचा सूर आणि स्वतःची जागा मिळावी, एवढीच अपेक्षा.
“येथील सर्व मजकूर काल्पनिक उदाहरणे आहेत. पात्रे, ठिकाणे व घटना काल्पनिक असून प्रत्यक्ष व्यक्ती किंवा घटनांशी साम्य निव्वळ योगायोग आहे.”
मी माझ्या विचारांनी काही गोष्टी रंगविल्या आहेत तर काही ह्या अनुभवातून उतरवल्या आहेत.
कवितेचा, लेखाचा, गोष्टीचा आनंद घ्यावा हीच माझी इच्छा.
वाचत राहा. एखादी ओळ मनात राहिली, तर ती माझ्यापर्यंतही पोहोचू द्या.
लेखन शोधा