चारोळी
1 मि. वाचन
चारोळी२ नोव्हेंबर, २०२६

अश्रूंमध्ये विरघळलेलं प्रेम...

अश्रूंमध्ये विरघळलेलं प्रेम...

नको होतं तेच आज घडलं,
माझ्यामुळे तुझ्या डोळ्यांत अश्रू दाटलं...

तुझ्यासमोर मी सारं विसरून गेले,
आठवणींचे डोंगर पुन्हा उलगडून गेले...

नशिबातले चार सुखाचे क्षण आले,
पण अश्रूंच्या धारेत तेही वाहून गेले...

अश्रूंच्या प्रत्येक थेंबात प्रेम टिपलेलं,
दुःखाच्या वादळाने सारं मन भिजवलेलं...